Home > News Update > मोठी बातमी! देशात घातपात घडवण्याचा मोठा कट उधळला, सहा दहशतवाद्यांना अटक, महाराष्ट्रातील एकाचा समावेश

मोठी बातमी! देशात घातपात घडवण्याचा मोठा कट उधळला, सहा दहशतवाद्यांना अटक, महाराष्ट्रातील एकाचा समावेश

मोठी बातमी! देशात घातपात घडवण्याचा मोठा कट उधळला, सहा दहशतवाद्यांना अटक, महाराष्ट्रातील एकाचा समावेश Six terrorists planning attack before Uttar Pradesh polls arrested by Delhi Police

मोठी बातमी! देशात घातपात घडवण्याचा मोठा कट उधळला, सहा दहशतवाद्यांना अटक, महाराष्ट्रातील एकाचा समावेश
X

दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केल्याचा दावा केला आहे. या संशयीत दहशतवाद्यांचा देशात सण उत्सवा दरम्यान विविध भागात स्फोट घडवून आणण्याची योजना होती. असं पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केलेल्यांपैकी दोन दहशतवादी हल्ल्याच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेले असल्याचं देखील सांगितलं आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या पोलिसांना दहशतवाद्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर या सर्व राज्याने समन्वयाने ही कारवाई केली. ही क्रिया एकाच वेळी विविध ठिकाणी करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे वरिष्ठ अधिकारी नीरज ठाकूर यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया दिली.

"महाराष्ट्रातील एका दहशतवाद्याला राजस्थानच्या कोटा येथे टाकलेल्या छाप्यात अटक केली आहे. या दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) तीन जणांना अटक केली. तर इतर दोन जणांना दिल्लीतून अटक केली."

अटक केलेल्या व्यक्तीची नाव मोहम्मद शेख, ओसामा, मूलचंद, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर आणि महंमद अली जावेद अशी आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून दोन ग्रेनेड, दोन आयईडी स्फोटक, एक किलो आरडीएक्स आणि एक इटालियन पिस्तूल देखील जप्त केले आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी ओसामा मस्कत गेला होता. पुढे बोटीने पाकिस्तानला गेला होता.

पोलीस अधिकारी नीरज ठाकूर यांनी सांगितले की, या लोकांना पाकिस्तानातील एका फार्म हाऊसमध्ये 15 दिवस ठेवण्यात आले आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला एका केंद्रीय एजन्सीकडून, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित काही दहशतवाद्यांना भारतात उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट घडवायचे होते. त्यांच्याकडे अनेक आयईडी आहेत.

Updated : 14 Sep 2021 5:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top