Home > News Update > ठाणे मंडळ कार्यालयात महावितरण कामगारांचे ठिय्या आंदोलन

ठाणे मंडळ कार्यालयात महावितरण कामगारांचे ठिय्या आंदोलन

ठाणे मंडळ कार्यालयात महावितरण कामगारांचे ठिय्या आंदोलन
X

ठाणे // गेल्या दिड वर्षांपासून महावितरणच्या ठाणे विभागातील प्रशासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णय घेतल्याचे म्हणत आज महावितरणच्या विविध संघटनानी एकत्र येऊन मुख्यालयासमोर निदर्शने केली. महावितरणच्या इंटकची वीज कामगार,कामगार सेना,कामगार महासंघ,मागासवर्गीय संघटना,स्वाभिमानी विद्युत वर्कर्स या संघटनांनी आज एकत्र येत प्रशासकीय कामकाजा विरोधात निदर्शने केली.

याप्रसंगी ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनीही या निदर्शन आंदोलनात सहभाग घेत ठाणे मंडल अधिक्षक अभियंता अरविंद बुरपुल्ले,कार्यकारी अभियंता शमाने व एच.आर. मॅनेजर श्रीमती रसिका भोळे यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी केली.

याप्रसंगी बोलताना कृती समितीचे निमंत्रक व इंटकचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.संदिप वंजारी यांनी म्हटले की, प्रशासकीय परिपत्रक 514 नुसार प्रशासन निर्णय न घेता फक्त कागदी घोडे नाचवून आपल्या मर्जीनुसार काम सुरू असल्याचा आरोप केला. परिपत्रकाचा अनादर करित काही निर्णय होत असून वारंवार निदर्शनास आणून देखील प्रशासन दखल घेत नसल्यामुळेच आज हे आंदोलन नाईलाजास्तव करण्यात आले.

तर इंटकचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले की, प्रशासन जाणूनबुजून काही मर्जीतील कामगारांना व अधिकाऱ्यांना पाठीशी घालून इतर संघटनांच्या मागणीला केराची टोपली दाखवत असून आता महावितरण कामगार हे सहन करणार नसल्याचे सांगितले. या निर्देशनाबाबत वीज कामगार सेनेचे विनायक जाधव,कामगार महासंघाचे रमेश नाईक,स्वाभिमानी वीज वर्कर्स युनियनचे विवेक महाले व महावितरणच्या मागासवर्गीय संघटनेचे दिलीप वाघमारे यांची उपस्थिती होती.

Updated : 15 Nov 2021 2:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top