Home > News Update > गायिका नेहा सिंग राठोडचं बेरोजगारावर नवीन गाणं सरकारवर टीका

गायिका नेहा सिंग राठोडचं बेरोजगारावर नवीन गाणं सरकारवर टीका

गायिका नेहा सिंग राठोडचं बेरोजगारावर नवीन गाणं सरकारवर टीका
X

यूपी में का बा फेम नेहा राठौरने नुकतेच एक नवीन गाणे रिलीज केले आहे. नेहाने तिच्या गाण्यात बेरोजगारीचा विषय मांडला. बेरोजगार बानी साहेब रोजगार मांगिला असे या गाण्याचे बोल आहे. नेहा राठोड म्हणाली सरकारला हे गाणं नसेल आवडला तर खुशाल त्यांनी मला नोटिस द्यावी . सध्या सर्वत्र सोशल मीडियावरही तिची आणि तिच्या गाण्याची चर्चा होत आहे.

मंगळवारी नेहा राठौरला उत्तर प्रदेश पोलिसांकडून एक सूचना मिळाली. कानपूरच्या अग्निकांड घटनेचा मुद्दा पुढे आणून लिहिण्यात आलेले हे गाणे, नोटीस पाठवण्याचा पाया ठरला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नेहा राठोडने का बा सिझन २ या व्हिडिओमध्ये शत्रुत्व आणि चिंता वाढवली. तसेच पोलिसांनी या इशाऱ्याला तीन दिवसांत उत्तर देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

या नोटीसला उत्तर देण्यापूर्वी नेहा राठोडने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नवीन गाणे पोस्ट केले आहे. इथेच बेरोजगार बानी साहेब रोजगार मांगिला भीख नाही हक सरकार मांगिला, दो करोड नौकरी देवे का रहे वादा, कहत रहे रोजगार मिली जादा अश्या पद्धतीचे गाणं पोस्ट केलं आहे

माझे संगीत समाजात शांतता भंग शकते. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या नेहा राठोडने सांगितले की, तरुणांना नोकरी शोधण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मी असे केले आहे. या गाण्याने सामाजिक शांतता भंग झाली असेल. आणि त्यामुळे मुले अडचणीत ही येऊ शकतात. या गाण्यासाठी नोटीस पाठवल्याबद्दल तुमचे स्वागत आहे, असेही नेहाने म्हटले आहे.

ट्विटरवर अल्पावधीतच 50,000 हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या गाण्याला युजर्सचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. युजर शेफाली तोमरच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाला सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे.

नेहा सिंग ही व्यक्ति, 1997 मध्ये नेहा सिंह राठौरचा बिहारच्या कैमूर जिल्ह्यात जन्म झाला. नेहाने तिचे शिक्षण बिहारमध्ये पूर्ण केले. तिने कानपूर विद्यापीठातून पदवीही घेतली आहे. तिने 2018 मध्ये गायिका म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दरम्यान नेहाचं यु. पी. मे का बा? हे गाणं अतिशय प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर नेहाने एकाच गाण्याच्या दोन वेगळ्या आवृत्त्या तयार केल्या..

ब्लाऊज हुक आणि लेहंगा स्ट्रिंग या प्रकारातून भोजपुरी गाणी बाहेर काढणं तिला आवश्यक वाटतं. इंटरनेटचा चांगला वापर करण्यासाठी तिने घरापासून दूर वाराणसीच्या वसतिगृहात राहिली. बिहारच्या ग्रामीण भागात मुली सक्रिय नाहीत. तिथे त्यांच काहीच चालत नाही. त्यांना खूप बोलण्याची इच्छा असते. तरीही ते शांत असतात. नेहा ने सांगितले की तिची मानसिकता सुधारण्याच्या प्रयत्नात ती गायिका बनली.

Updated : 25 Feb 2023 4:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top