Home > News Update > सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा पॅनल आणि महाविकास आघाडीचा पॅनल यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला
X

सिंधुदुर्ग // सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा पॅनल आणि महाविकास आघाडीचा पॅनल यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत कणकवलीत मतदानाचा हक्क बजावला आहे.

जिल्ह्यात 8 मतदान केंद्र असून तहसीलदार कार्यालयात मतदान केंद्र आहेत. तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही मतदान केंद्र आहे. आमदार वैभव नाईक आणि राजन तेली 8 वाजता आपला मतदानाचा हक्क बजावला. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर 2008 पासून राणे यांची सत्ता होती. मात्र, 2017 मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत राणे यांच्यापासून दूर होत शिवसेनेत गेले. त्यानंतर बँके शिवसेनेच्या ताब्यात दोन वर्ष राहिली.

या आधी एकूण 19 जागांसाठी शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अशा दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसला 8, राष्ट्रवादी 7, शिवसेना 2, भाजपा 1 आणि अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या होत्या. सध्या महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत होत आहे.

Updated : 30 Dec 2021 3:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top