Home > News Update > इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या अटकेतील साम्य, काय आहे ३ ऑक्टोबरचे महत्व?

इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या अटकेतील साम्य, काय आहे ३ ऑक्टोबरचे महत्व?

इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या अटकेतील साम्य, काय आहे ३ ऑक्टोबरचे महत्व?
X

काँग्रेसच्या नेत्या आणि गांधी घराण्याच्या कन्या प्रियंका गांधी य़ांना अखेर उ. प्रदेश सरकारने अटक केली आहे. लखीमपूर येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडानंतर प्रियंका गांधी मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले आणि ताब्यात घेतले. त्यांना जवळच असलेल्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे. पण २४ तास उलटूनही प्रियंका गांधी आणि त्यांच्या सहकाराऱ्यांविरोधात FIR दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी अखेर प्रिंयका गांधी आणि इतर ११ जणांवर शांततेचा भंग केल्याचा ठपका ठेवत FIR दाखल कऱण्यात आला आहे. आपल्याला कोणत्याही ऑर्डर किंवा FIR शिवाय २८ तास डांबून ठेवण्यात आले, असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी ट्विट केले आहे, "इंदिरा गांधी यांनी याच दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबर १९७७ला अटक करण्यात आली होती. तर ३ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे" असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर काँग्रेसचे आणखी एक नेते सुनिल जाखड यांनीही ट्विट करुन प्रियंका गांधींच्या अटकेची तुलना इंदिरा गांधी यांच्या अटकेशी केली आहे. "३ ऑक्टोबर १९७७ रोजी इंदिरा गांधी यांना झालेली अटक ही तेव्हाच्या जनता पार्टी सरकारच्या नाशाचे कारण ठरले होते. तर प्रियंका गांधी यांची अटक म्हणजे भाजप सरकारच्या अंताची सुरूवात आहे" असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

इंदिरा गांधी यांच्या अटकेचे नाट्य

३ ऑक्टोबर १९७७ रोजी तेव्हाच्य़ा मोरारजी देसाई सरकारने इंदिरा गांधी यांना जीप खरेदी घोटाळा प्रकरणात अटक केली होती. चौधऱी चरणसिंग हे तेव्हा गृहमंत्री होते. इंदिरा गांधी यांच्या अटकेसाठी सीबीआयची टीम जेव्हा त्यांच्या निवासस्थानी गेली तेव्हा, काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यानंतर इंदिरा गांधी यांचा जोरदार जयजयकार करण्यात आला होता. १६ तास अटकेत राहिल्यानंतर कोर्टाने इंदिरा गांधी यांना जामीन मंजूर केला होता.

प्रियंका गांधी यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अटक करण्यात आली आहे. उ. प्रदेशात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला काँग्रेस पक्ष लागला आहे. प्रियंका गांधी यांच्यावर उ. प्रदेशात मोठी जबाबदारी आहे. आता या अटकेचे पडसाद येत्या काळात उ. प्रदेशच्या राजकारणात कसे पडतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 5 Oct 2021 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top