Top
Home > Max Political > “छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेली हॉटेल आणि बार बंद करा”

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेली हॉटेल आणि बार बंद करा”

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेली हॉटेल आणि बार बंद करा”
X

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेली राज्यातील हॉटेल आणि बारवर बंद करा अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीये. आजके शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन जो वाद सुरू आहे त्या वादात आता सुधीर मुनगंटीवार यांनी उडी घेतलीये. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यासंबंधात जीआर काढण्याची मागणी केलीये.

कोणत्याही व्यक्तीची शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे राज्यात काही नेत्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांवरही बंदी घालण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केलीये, अशी पुस्तकं ही शिवभक्तांचा अवमान असल्याचंही त्यांनी यात म्हटलंय.

हे ही वाचा

याच पत्रात सुधीर मुनगंटीवार यांनी आजके शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक मागे घेण्यात आल्याचं सांगितलंय. पण त्याचबरोबर जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या आजके शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर बंदी घालण्याच्या मागणीचं मुनगंटीवार यांनीही समर्थन केले आहे.

Updated : 15 Jan 2020 2:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top