Home > News Update > बाप लेक भावूक ; डोळे पाणावले..!

बाप लेक भावूक ; डोळे पाणावले..!

कोल्हापूरात शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन सुरू आहे. दरम्यानं खासदार श्रीकांत शिंदे भावूक झाल्यानंतर सभेत सर्वत्र शांतता पसरली होती. श्रीकांत यांच्या वक्तव्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अश्रू अनावर झाले होते.

बाप लेक भावूक ; डोळे पाणावले..!
X

Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आज कोल्हापुरात पहिला महामेळावा पार पडला. या मेळाव्यात भाषण करताना मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे भावूक झाले.

लहानपणाच्या आठवणींनी डोळे पाणी

दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, "मी शिंदे साहेबांना जे पाहिलं ते फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं. मला लहानपणाचा एकही असा सण आठवत नाही की ज्या दिवशी माझे वडील माझ्यासोबत घरी सण साजरा केला किंवा एक दिवस व्यतीत केला. ते सतत लोकांमध्ये असायचे. त्यामुळे आम्ही आधी त्यांच्याबद्दल खूप तक्रारी करायचो की, आमच्यासाठी कधी वेळ देणार? त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसायचं. सभेत भाषणादरम्यान "आम्हाला कधी...", असं बोलताना श्रीकांत शिंदे भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. यावेळी संपूर्ण सभेत शांतता पसरली होती.

"मला माझ्या बापाचा अभिमान आहे"

थोड्या वेळानंतर शिंदे यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. "मला माझ्या बापाचा अभिमान आहे. ज्या बापाने या सर्व शिवसैनिकांना आपलं कुटुंब मानलं म्हणून हा साधारण शिवसैनिक या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला", असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही अश्रू अनावर

दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही भावूक झाले त्यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट केली. ते म्हणाले की " पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला. सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते". अशा पद्धतीची एक्स पोस्ट करत मुंख्यमंत्री शिंदे भावूक झाले.

श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर टीका

"आज भरपूर लोकं माझा बाप चोरला म्हणून म्हणत आहेत. रोज उठलं की बाप चोरला असं म्हणातात. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कुणा एकाचे वैयक्तिक मालमत्ता नाही. या महाराष्ट्रात एकच बाप होऊन गेला. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे", अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

Updated : 17 Feb 2024 3:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top