Home > News Update > श्री क्षेत्र काशी विश्र्वेश्वर येथे भक्तांविना साजरा होतोय श्रावणी सोमवार

श्री क्षेत्र काशी विश्र्वेश्वर येथे भक्तांविना साजरा होतोय श्रावणी सोमवार

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मंदिर बंद असल्याने संगमनेरच्या काशीविश्र्वेश्वर येथे पहिला श्रावणी सोमवार भक्तांविनाच साजरा होत आहे.

श्री क्षेत्र काशी विश्र्वेश्वर येथे भक्तांविना साजरा होतोय श्रावणी सोमवार
X

अहमदनगर : संगमनेरपासून अवघ्या आठ किलोमीटर असलेल्या श्री क्षेत्र काशीविश्र्वेश्वर देवस्थान येथे दरवर्षी श्रावणी सोमवार, महाशिवरात्र आणि सोमवती अमावस्या या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मंदिर बंद असल्याने पहिला श्रावणी सोमवार भक्तांविनाच साजरा होत आहे.

श्री क्षेत्र काशी विश्र्वेश्वर येथे पंचमुखी शिवलिंग आहे, या ठिकाणी अगस्ती ऋषींनी काही काळ विश्रांती केली, अशी अख्यायिका आहे. येथे असणारे शिवलिंग स्वयंभू असल्याचे भाविक सांगतात. येथे रुद्राक्ष, उंबर, अजान वृक्ष, सिद्धी उंबर, चाफा, सोनचाफा इत्यादी वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. भाविकांसाठी विविध सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

विशेष म्हणजे या छोट्याशा गावात 174 भजनी आहेत. ग्रामस्थांनी येथे एक बहुउद्देशीय हॉल उभारून ना नफा ना तोटा या तत्त्वावर सर्व नागरिकांसाठी हा हॉल खुला केला आहे.

अशा या हजारो भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिर दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी असते मात्र, यंदा शासनाकडून घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करून येथे भक्ताविना विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. अशी माहिती देवस्थानचे पुजारी बन्सी महाराज गुंजाळ यांनी दिली आहे.

Updated : 9 Aug 2021 7:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top