Home > News Update > Shraddha Walkar case : दोन वर्षापुर्वी व्यक्त केलेली भीती ठरली खरी, तत्कालिन गृहमंत्र्यांच्या अडचणी वाढणार

Shraddha Walkar case : दोन वर्षापुर्वी व्यक्त केलेली भीती ठरली खरी, तत्कालिन गृहमंत्र्यांच्या अडचणी वाढणार

Shraddha Walkar case : दोन वर्षापुर्वी व्यक्त केलेली भीती ठरली खरी, तत्कालिन गृहमंत्र्यांच्या अडचणी वाढणार
X

श्रध्दा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यापार्श्वभुमीवर श्रध्दा वालकरने दोन वर्षापुर्वी पोलिसांना दिलेला तक्रार अर्ज समोर आला आहे. त्यामुळे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अफताब पुनावाला या युवकाने दिल्लीत गर्लफ्रेंड श्रध्दा वालकरच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे करून हत्या केली होती. या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. त्यापार्श्वभुमीवर दिल्ली पोलिसांनी नालासोपारा येथे तपास केला. या तपासात श्रध्दा वालकर हिने दोन वर्षापुर्वी पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचे समोर आले आहे.

अफताब मला दररोज मारहाण करीत आहे. तो माझी हत्या करून शरीराचे तुकडे करून फेकून देईल, अशी धमकी देत असल्याची तक्रार श्रध्दा वालकरने 23 नोव्हेंबर 2020 रोजी तुळींज पोलिस ठाण्यात केली होती. त्यावेळी श्रध्दाने व्यक्त केलेली भीती खरी ठरली असून श्रध्दाने केलेला अर्ज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा अर्ज या प्रकरणात मोठा पुरावा ठरणार आहे.





श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 मध्ये तुळींज पोलीस ठाण्यात अफताबच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीत तिने अफताब मागील सहा महिन्यापासून मारहाण करत असून त्याने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे. तसेच शरीराचे तुकडे करून फेकून देईल, असं म्हटल्याचे श्रध्दाने तक्रार अर्जात म्हटले होते. यासंदर्भात अफताबच्या कुटूंबियांनाही माहिती असल्याचे श्रध्दाने सांगितले होते. तसेच श्रध्दाने अफताब आणि ती लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतरही पोलिसांनी कारवाई केली नाही. जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर श्रध्दा आज जिवंत असती, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात तात्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Updated : 23 Nov 2022 10:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top