दिल्लीत “आप” आमदारावर गोळीबार, एकाचा मृत्यू
Max Maharashtra | 12 Feb 2020 3:16 AM GMT
X
X
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'च्या विजयाला गालबोट लागले आहे. आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. मंदिरातून परतत असताना हा हल्ला झाला आहे.
'आप’पक्षाचे कार्यकर्ते अशोक मान यांचा या हल्लात मृत्यू झाला आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी या घटनेची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत नरेश यादव हे एकूण 62 हजार 417 मतांनी विजयी झाले. त्यानंतर आमदार नरेश यादव हे मंदिरात गेले होते. त्यांनतर तेथून ते परतत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
या हल्यात बंदुकीतून चार राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती यादव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. अरूणा आसफ अली मार्गावर हा गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Updated : 12 Feb 2020 3:16 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire