Home > News Update > दिलासा : निर्बंध शिथिल, दुकाने ८ वाजेपर्यंत खुली राहणार

दिलासा : निर्बंध शिथिल, दुकाने ८ वाजेपर्यंत खुली राहणार

दिलासा : निर्बंध शिथिल, दुकाने ८ वाजेपर्यंत खुली राहणार
X

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लावलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातली माहिती पत्रकारांना दिली.

महापुराचे फटका बसलेलेल सहा जिल्हे पूर परिस्थितीपूर्वीपासून कोरोनाशी लढताहेत. सांगली परिसरात कोरोनाच्या संख्या वाढवा असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. रुग्णवाढ कमी होत नाहीत तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवतो आहोत. पण लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांना कामाच्या वेळा विभागण्याची विनंती करतो आहोत,वर्क फ्रॉम होमचे नियोजन करा, उद्योगांना शक्य आहे तिथे बायो बबल करा व आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

नागरिकांचे जीव वाचविणे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. राज्यात आज १२५० ते १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन आपण दररोज उत्पादन करतो आहोत. पण पुढची जी संभाव्य लाट आहे त्याबाबत केंद्रानेही आपल्याला निर्देश दिले आहेत. या संभाव्य लाटेत दुपटीपेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निर्बंध शिथिल झाले तरी प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क घालावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Updated : 2 Aug 2021 1:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top