Home > News Update > शिर्डीतील साई मंदिर परिसरातील दुकाने साडेआठ वाजेपर्यंत खुली राहणार

शिर्डीतील साई मंदिर परिसरातील दुकाने साडेआठ वाजेपर्यंत खुली राहणार

शिर्डीतील साई मंदिर परिसरातील दुकाने साडेआठ वाजेपर्यंत खुली राहणार
X

शिर्डी : साईबाबांचे समाधी मंदिर 7 तारखेला भाविकांच्या दर्शनासाठी खुले होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरातील दुकाने रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मंदिरे खुले करण्यापूर्वी शिर्डीत जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की, जिल्हातील मंदिराच्या संस्थांनी हमीपत्र देणे गरजेचे आहे.

शिर्डीतील व्यावसायिकांसाठी मुख्याधिकारी नरपरिषद नगर पंचायत यांना देखील सूचना दिल्या आहे. भाविकांना पूजेचं साहित्यही आणता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळूनच भाविकांना दर्शन दिले जाईल, यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत उपस्थित होत्या.

दरम्यान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कोरोनाचे नियम पाळून शासन - प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.

Updated : 5 Oct 2021 12:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top