Home > News Update > पैशाच्या वादातून सायन कोळीवाड्यात गोळीबार...!

पैशाच्या वादातून सायन कोळीवाड्यात गोळीबार...!

पैशाच्या वादातून सायन कोळीवाड्यात गोळीबार...!
X

पैशाच्या व्यवहारीक संबंधातून मुंबईतल्या सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सदरील गोळीबारात गोळी लागलेला व्यक्ती अतिशय गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस तसेच मुंबई पोलीसांकडून गोळीबारासंदर्भात अधिक तपास सूरू आहे. शनिवारी पहाटे पाच वाजता ही गोळीबाराची घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे.

गोळीबार झालेल्या या घटनेत गोळी झाडणार आणि पिडीत व्यक्ती यांच्यामध्ये पैशाच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. या वादात टोकाचं पाऊल उचलत आरोपीने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. अक्षय कदम उर्फ स्वामी(वय: ३४) असं पिडीत तरूणाचं नाव असून सध्या त्याच्यावर सायनच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

नक्की काय घडलं होतं...?

मुंबईतल्या सायन कोळीवाडा परिसरातील एका घरात शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पिडीत तरूण अक्षय स्वामी हा सायन कोळीवाडा परिसरातील एका चर्चच्या बाजूच्या परिसरामध्ये असलेल्या घरात एकटाच रहात होता. शनिवारी पहाटे आरोपी विवेक चेत्तीयार हा आरोपी तरूण अक्षयच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. आकाशने दरवाजा उघडताच आरोपी विवेकने त्याच्या हातातील बंदूक ताणून आकाशवर दोन राऊंड फायर केले, अशी माहिती समोर आली आहे.

सदरील घटनेसंदर्भात अँटॉप हिल पोलीसांनी आरोपीविरुध्द भादंवि कलम ३०७ आणि शस्ञास्ञ कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Updated : 7 April 2024 8:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top