Home > Election 2020 > शिवसेना भाजपला शेवटचं विचारणार; ५०-५० फॉर्म्युलासाठी तयार आहात का?

शिवसेना भाजपला शेवटचं विचारणार; ५०-५० फॉर्म्युलासाठी तयार आहात का?

शिवसेना भाजपला शेवटचं विचारणार; ५०-५० फॉर्म्युलासाठी तयार आहात का?
X

भाजपने राज्यात सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दाखवल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. आपला सत्ता स्थापनेचा दावा करण्याआधी शिवसेना भाजपला शेवटची संधी देणार आहे. भाजप अजूनही अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहे का याबाबत शिवसेना भाजपकडे विचारणा करणार आहे.

राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना उद्या सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. निवडणूक सोबत लढल्यानंतर केवळ मुख्यमंत्रीपदाच्या समान वाटपावरून दोन्ही पक्षात संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर आता शिवसेना आपला मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांचा पाठिंबा घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याआधी भाजपला विचारणा करून शिवसेना औपचारिकता पूर्ण करणार असल्याचं बोललं जातं आहे.

Updated : 10 Nov 2019 4:59 PM GMT
Next Story
Share it
Top