Home > News Update > ठाकरे गट लढवणार मुंबईतील महत्वाच्या चार जागा ?

ठाकरे गट लढवणार मुंबईतील महत्वाच्या चार जागा ?

ठाकरे गट लढवणार मुंबईतील महत्वाच्या चार जागा ?
X

Mumbai: आगामी लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election 2024) घोषणा होण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या (MVA Seat Sharing )चर्चेला वेग आला आहे. ठाकरे गट (Shivsena UBT ) मुंबईतील ४ जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून केवळ 8 लोकसभा मतदारसंघ वगळता उर्वरित 40 जागा कोणी लढवायच्या याबाबत मविआच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. यामध्ये लोकसभेच्या18 जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाने भाजपसोबत युतीत असताना मुंबईत केवळ 3 उमेदवारच उभे केले होते. परंतु, आता यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गट मुंबईतील आणखी एका जागेवर उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आतापर्यंत कायम भाजपच्या वाट्याला आला होता. परंतु, यंदा ठाकरे गट या मतदारसंघातून आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.

ठाकरे गट 4 मतदारसंघात उमेदवार उभे करणार ?

ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे. . उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांची नियुक्ती केली होती. यामध्ये दक्षिण मुंबईसाठी सुधीर साळवी, सत्यवान उभे, दक्षिण मध्य मुंबईसाठी रवींद्र मिर्लेकर, वायव्य मुंबईसाठी विलास पोतनीस तर ईशान्य मुंबईत दत्ता दळवी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारी कोणाला मिळणार ?

मुंबईच्या ४ मतदार संघात कोणाला लोकसभा उमेदवारी मिळणार ठाकरे गट कोणाला उमेदवारी देणार, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यापैकी दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत ( Arvind sawant ) यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.तर दक्षिण मध्य मुंबईतून यापूर्वी राज्यसभेचे खासदार असणारे आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनिल देसाई ( Anil Desai ) लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर ( Amol Kirtikar ) निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील ( Sanjay Dina Patil ) हे ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात.

Updated : 22 Feb 2024 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top