Home > News Update > धनंजय मुंडेंचा विषय हा राजकीय नसुन कौटुंबिक- संजय राऊत

धनंजय मुंडेंचा विषय हा राजकीय नसुन कौटुंबिक- संजय राऊत

धनंजय मुंडेंचा विषय हा राजकीय नसुन कौटुंबिक- संजय राऊत
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर विरोधक राजीनाम्यासाठी आक्रमक असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संपूर्ण प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार योग्य निर्णय घेतील असं सांगत कौटुंबिक विषयात राजकारण करणं योग्य नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

मुंडेंमुळे महाविकास आघाडी सरकार अजिबात अडचणीत येणार नाही, असही ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हे निर्णय घ्यायला सक्षम असुन, ते योग्य निर्णय घेतील . त्यामुळे या प्रकरणाला कोणीही राजकिय रंग देऊ नये अस आवाहन त्यांनी केले. शेतकरी कायद्यावर बोलतांना ते म्हणाले की, शेतकरी सरकारकडे गेले होते. त्यामुळे सरकार ने एक पाऊल पुढे येवून हा तिढा सोडवावा. त्याने सरकारवर काही आभाळ कोसळणार नाही, आणि सरकार ची कोणती प्रतिमाही मलीन होणार नाही. उलट त्याने सरकार ची प्रतिमा सुधारेल, असही ते म्हणाले.

नवाब मलीक यांच्या जावई विषयी विचारले असता, केंद्रात आणि राज्यात वेगळे सरकार असले की, अश्या गोष्टी घडत असतात. मला या विषयी जास्त काही माहिती नाही. पण नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारची बाजु भक्कमपणे मांडत असतात. पश्चिम बंगालच्या एका नेत्याच्या बाबतीत ही असं घडल आहे. लोकांच्याही या गोष्टी लक्षात आल्या असल्याच त्यांनी सांगितले.

Updated : 14 Jan 2021 7:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top