Home > News Update > अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालंय: शिवसेना नेते खासदार संजय राऊत

अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालंय: शिवसेना नेते खासदार संजय राऊत

महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष झालं आहे. अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालंय. त्यामुळचं भाजप नेते भ्रमिष्ठ झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली.

अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालंय:  शिवसेना नेते खासदार संजय राऊत
X

भाजप लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करत आहे.उत्तर प्रदेशमध्ये करत आहेत, इतर राज्यांमध्ये करत आहेत. तर, माझी सूचना अशी आहे की इतर राज्यात कोण काय कायदा करतं ते पाहायचं आहे. खासकरुन बिहारमध्ये नितीश कुमार भाजपच्या सहकार्याने तिथे मुख्यमंत्री झाले आहेत. ते सरकार भाजप चालवत आहेत. त्यांचं सरकार लव्ह जिहाद बाबत जो कायदा करतील त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करु आणि त्यानंतर महाराष्ट्राला यासंदर्भातील प्रश्न विचारावे.

पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडल्यानंतर या विषयातील राजकारण संपेल. भाजपकडे विकासाचे मुद्दे नाहीत. महाराष्ट्रामध्ये विकासासंदर्भात मुख्यमंत्री जे काम करत आहेत, ते डिस्टर्ब करायचं अशा प्रकारचं एक धोरणात्मक निर्णय भाजपचा असेल, तरी या अडथळ्यांच्या शर्यतीत सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विकासाच्या मार्गाने जातील. महाराष्ट्राला तीन वर्षातच पहिल्या क्रमांकावर नेऊ, असा विश्वास आणि आत्मविश्वास आम्हाला आहे, असं राऊत म्हणाले.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत त्यावर कोणीही बोलत नाही. त्यातुलनेत पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलचे भाव कमी व्हायला हवेत. त्यावर कोणीही बोलत नाही, असं संजय राऊत यांनी वीजबिल प्रश्नी बोलताना सांगितले.

बरोबर एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा धक्का बसून पहाटे राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. या घटनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली.

"महाराष्ट्रातील भाजप नेते पातळी सोडून टीका करत आहेत. शरद पवार हे छोटे नेते आहेत असं भाजप नेते म्हणाले, मग नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला मग मोदी सरकारला कळत नाही का?", असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

"शरद पवार यांच्यासारख्या नेत्यावर अशा प्रकारची टीका करणे म्हणजे तुमचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. सत्ता येते जाते. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या सारख्या नेत्यांची उंची कोणी काही बोललं म्हणून कमी होत नाही", असं संजय राऊत म्हणाले.

"देशात तसंच जगात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. पंतप्रधान मोदी याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. कोरोनाचं संकट दुसऱ्या महायुद्धासारखं गंभीर हे मोदी सांगतात, पण हे गंभीर संकट महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कळत नसेल तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची ही कमतरता आहे. अख्ख्या देशात मोदी काय सांगतात ते समजतं पण महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्यांना ते कळत नाही", असं टीकास्त्र राऊतांनी भाजपवर सोडलं.

महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष झालं आहे. अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालंय. त्यामुळचं भाजप नेते भ्रमिष्ठ झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली.महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष झालं आहे. अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालंय. त्यामुळचं भाजप नेते भ्रमिष्ठ झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली.कोरोना हा विषय राजकारण करण्याच्या नाही. सर्वांनी एकत्र येऊन या संकटाशी सामना करावा. पक्ष आणि राजकारण दूर ठेवून मानवतेच्या दृष्टीने जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. पंतप्रधान मोदी बरोबर म्हणतात दुसऱ्या महायुद्धासारखंच हे संकट आहे. भाजपचे महाराष्ट्रातील पुढारी एका वेगळ्या दिशेने लोकांना घेवून जात आहेत, असं राऊत म्हणाले.

Updated : 23 Nov 2020 8:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top