शिवसेनेला सोनूवर भरवसा नाय का?

Sanjay raut Sonu sood

कोरोनाच्या संकटामुळे सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये पोटा पाण्यासाठी गेलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात परत पोहोचवण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. यात अभिनेता सोनू सूदने या मजुरांना मदतीचा हात देत त्यांच्या घरी पोहोचवण्याची त्याने सोय केली. मात्र मजुरांसाठी हिरो ठरलेल्या सोनू सूदवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकारणी राज्य सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. सामनामधील रोखठोक या सदरातून राऊत यांनी ही टीका केली आहे.

मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले. अशी टीकाही त्यांनी केली आहे.