Home > News Update > शिवसेनेला धक्का..! आमदार रमेश लटके यांचे दुःखद निधन

शिवसेनेला धक्का..! आमदार रमेश लटके यांचे दुःखद निधन

काँग्रेसचा बालेकिल्ला भेदून राज्याचे तात्कालिन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचा पराभव करत विधानसभेत पोहचलेले शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबईत निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. तर आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेला धक्का..!  आमदार रमेश लटके यांचे दुःखद निधन
X

अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांचा पराभव केला होता. तसेच 2019 च्या निवडणूकीत लटके यांनी एम पटेल यांचाही पराभव केला होता.

रमेश लटके हे आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी दुबई येथे गेले होते. मात्र बुधवारी रात्री रमेश लटके यांचे कुटूंब शॉपिंगला गेले असताना लटके यांन हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्येच आमदार रमेश लटके यांचे निधन झाले, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तर आमदार रमेश लटके यांचे पार्थिव दुबईतून भारतात आणण्यासाठी प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.

रमेश लटके यांची कारकीर्द :

रमेश लटके यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात गणेश मंडळापासून केली. त्यानंतर रमेश लटके यांनी 1997 ते 2014 या काळात सलग तीनवेळा मुंबई महापालिकेचे नगरसेवकपद भुषवले. त्यातच गटप्रमुख ते आमदार असा राजकीय प्रवास केला.

आमदार रमेश लटके यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस नेते आणि तात्कालिन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना पराभव करत काँग्रेसचा बालेकिल्ला भेदला. कारण 1999 ते 2014 अशा प्रकारे सलग तीन वेळा सुरेश शेट्टी यांनी विजय मिळवला होता. मात्र 2014 साली आमदार रमेश लटके यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा सुरूंग लावला.

2014 साली अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि शिवसेना अशी तिहेरी लढत रंगली होती. त्यामध्ये रमेश लटके यांनी भाजपच्या सुनिल यादव यांचा 5 हजार 479 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2019 मध्येही अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांचा रमेश लटके यांनी 16 हजारपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. रमेश लटके यांचे निधन हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Updated : 12 May 2022 2:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top