Home > News Update > सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी ईडीकडे देणार : संजय राऊत

सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी ईडीकडे देणार : संजय राऊत

सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी ईडीकडे देणार :  संजय राऊत
X

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने धाड टाकल्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र-राज्य संघर्ष उफाळून आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा पलटवार करत आपण १२० नेत्यांची यादी ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे सोपवणार असल्याची माहिती दिली आहे.

सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी ईडीकडे देणार – संजय राऊतशिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना राऊत म्हणाले, त्यांनी महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. दरम्यान आपल्याला अद्याप ईडीची कोणती नोटीस आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"या सगळ्या चौकशा पूर्ण होऊद्यात नंतर १२० नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतो. या यादीत सत्ताधारी पक्षातील हे नेते आहेत. मग ईडी कोणाला नोटीस पाठवते हे पाहूयात," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

"मला अनेकांनी नोटीस आली का विचारलं. मी वाट पाहतोय आणि आली तरी आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवार किंवा अन्य कोणाला…नोटीस आली तर धक्का बसणार नाही. २० वर्ष जुनी थडगी उकरण्याचं काम सुरु असल्याचं मला कळलं आहे. आम्हीदेखील तयार आहोत," असं प्रतिआव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.


Updated : 25 Nov 2020 8:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top