Home > News Update > शिवसेना एका गुबगुबीत खुर्चीपुरता मर्यादित - चंद्रकांत पाटील

शिवसेना एका गुबगुबीत खुर्चीपुरता मर्यादित - चंद्रकांत पाटील

शिवसेना एका गुबगुबीत खुर्चीपुरता मर्यादित - चंद्रकांत पाटील
X



भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेमधील संघर्ष आता आणखी चिघळला आहे. चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दिक संघर्ष सध्या टोकाला पोहोचला आहे. "शिवसेना ही मुख्यमंत्रीपदाच्या एका गुबगुबीत खुर्ची पुरता मर्यादित झाली असून, शिवसेना संपत चालली आहे," अशी टीका चंद्रकांत दादा पाटील यांनी केली. सांगलीमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सांगलीचे पालकमंत्री मंत्री जयंत पाटील यांना घेरावा घालण्याची सांगलीतील स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्य असल्याचे म्हणत जनता आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादीला वैतागले आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

मुंबई बँकेत चेअरमन राष्ट्रवादी आणि व्हाईस चेअरमन भाजपाचा निवडून आला आहे. त्यामुळे आता तरी शिवसेनेला कळायला हवं की, शिवसेनेला फक्त एक मुख्यमंत्रीपदाची गुबगुबीत खुर्ची मिळाली आहे, बाकी काही मिळालेले नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. "शिवसेनेला सहकार, विद्यापीठ कायदा अशा अनेक गोष्टींची माहिती नाही" असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसचा प्रचार केला काय किंवा शिवसेनेचा केला तरी सांगलीत भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

Updated : 15 Jan 2022 7:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top