Home > News Update > जागावाटपाचा तिढा | शिवसेना एक पाऊल मागे तर भाजप जोरात

जागावाटपाचा तिढा | शिवसेना एक पाऊल मागे तर भाजप जोरात

जागावाटपाचा तिढा | शिवसेना एक पाऊल मागे तर भाजप जोरात
X

शिवसेना-भाजपची युती होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी संयुक्त पत्रक काढून घोषित केलेली असली तरी जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आधीच १२६ वर अडकलेल्या शिवसेनेला आणखी जाळ्यात पकडून मित्रपक्षांना जागा द्या अशी मनधरणी भाजपकडून सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या विद्यमान ६ ते ७ आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याचं विश्‍वसनीय सूत्रांकडून समजतंय. त्यातील मुंबईतील दोन आमदारांचा समावेश आहे. ६ ते ७ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करायची का असा एक मतप्रवाह शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये सुरु आहे. एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात शिवसेना आग्रही आहे. कल्याण पूर्व, पश्चिम या ठिकाणीही भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. बेलापूर आणि नवी मुंबई ही जागा भाजपला दिल्यानं शिवसैनिक नाराज आहेत. तर काही शिवसेना नेत्यांनी आपले राजीनामे पाठवल्याचं सांगण्यात येतंय.

दोन्ही पक्षांतील नाराजांमुळे जागावाटपाचा अंतिम आकडा सोमवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर केला गेला नव्हता. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी कोकण, मुंबईत शिवसेनेला झुकते माप देण्यात आले आहे. मराठवाडा आणि विदर्भात भाजपला झुकते माप मिळाले आहे. मुंबईत भाजप १७, सेना १९, कोकणात भाजप १८, सेना ३१, विदर्भात भाजप ६२, सेना ५२ असे वाटप झाले आहे.

सिंधुदुर्ग १ (कणकवली), रायगड ३, कल्याण डोंबिवली २, उल्हासनगर १, अंबरनाथ १, पालघर २, नवी मुंबई २, ठाणे २, मीरा-भाईंदर १ अशा जांगाचे वाटप झाल्याचे कळते. कणकवली ही जागा भाजपला सुटली असून त्या जागेवर नितेश राणेंना उमेदवारी मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

Updated : 1 Oct 2019 7:00 AM GMT
Next Story
Share it
Top