Home > Max Political > नारायण राणे-संजय राऊत वाद : माजी खासदाराचा शिवसेनेला घरचा आहेर

नारायण राणे-संजय राऊत वाद : माजी खासदाराचा शिवसेनेला घरचा आहेर

नारायण राणे, संजय राऊत वादावरून माजी खासदाराने शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

नारायण राणे-संजय राऊत वाद : माजी खासदाराचा शिवसेनेला घरचा आहेर
X

राज्यात शिवसेना विरुध्द भाजप वाद रंगला आहे. त्यातूनच राज्यात राजकीय धुळवड पहायला मिळत आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत दररोज नवे पुरावे घेऊन भाजपवर निशाणा साधत आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. त्यावरून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

राज्यात नारायण राणे विरुध्द शिवसेना वाद पेटला आहे. या वादात शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्र सोडले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यामुळे शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

शिवाजी माने यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह ईडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भुमिका याबाबतही भाष्य केले आहे.

हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने यांनी म्हटले आहे की, ईडीचा घोटाळा जरूर काढा. परंतु राज्यसभेत व लोकसभेतही जनतेचे प्रश्न मांडा. ईडीच कायं वाकडं होणार हे आम्हालाही माहीत आहे. आज पर्यंत अधिकार्यांचं काय झालं ते आत्ताच होणार आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, असे मत व्यक्त केले

पुढे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, ही नवीन समाजकारणाची पध्दती पहावयास मिळते आहे. ज्याला आपण सुडाचे राजकारण म्हणू शकतो. बरं आम्ही कुणाशी भांडत आहोत ( आपल्याशीचं ) नं , कॅाग्रेस व राष्ट्रवादीं रिंगणाच्या बाहेरून मजा घेत आहे. अजित दादा वगळता या विषयावर कुणी भाष्य केलयं हे ऐकण्यात किंवा वाचण्यात नाही. गोर - गरीबांना घरे देण्याचं सोडून आम्ही आमचीचं पाडापाडी करत आहोत, अश्याने कायं साध्यं होणारं आहे, असा सवाल शिवाजी माने यांनी केला आहे.

संपुर्ण महाराष्ट्राला माहीती आहे की, कुणी किती कष्टाने कमाई केली आहे ते. संजय राऊत कोण होते? त्यांचा पगार किती होता ते किंवा नारायण राणेंचे व्यवसाय कोणते ? बरं राणे आता एवढ्या उशिरा खुनी दिसू लागले आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदी बसविले होते त्यावेळी ते काय धुतल्यां तांदळा सारखे होते काय? बरं साहेबांना संरक्षण देण्यासाठी त्यांनीच त्यांच्या जिवाची पर्वा केली नव्हती हे विसरलात का? मुबंईत जी शिवसेना वाढली ज्यांत मोजून काही मंडळी होती त्यांत राणे होतेचं नं. ऊगाच शिळ्या कढीला ऊत काय आणत आहात मग, असा सवाल शिवाजी माने यांनी विचारला.

पुढे माने म्हणाले, कॅा. दत्ता सामंतापासूनच्या हत्येचा शोध घेत बसा. कोण कोण गुन्हेगार व गुन्हा करण्यास मदत केली ते सर्व बाहेर येईल. शेवटी तुम्ही आम्ही सर्वचं जण फाटक्या शिवसैनिकांच्या जीवावर मोठे झालो आहोत, हे विसरून चाललो आहेत, हे मात्र नक्की. फाटक्यांचे राज्य कधी येणार? त्यांच स्वप्न कधी पुर्ण होणार ? एक गोष्ट विसरू नका. मुबंईला वाचविणारी मंडळीच आपआपसात भिडते आहे व ती कशी संपेल याचीच वाट काँग्रेस पहात आहे, असे मत स्पष्ट भुमिका शिवाजी माने यांनी मांडली.

Updated : 21 Feb 2022 11:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top