Top
Home > Max Political > होय शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री; अमरावतीत झळकले पोस्टर

होय शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री; अमरावतीत झळकले पोस्टर

होय शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री; अमरावतीत झळकले पोस्टर
X

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळालेल्या यशाचा फायदा शिवसेनेलाच अधिक होत असल्याच वारंवार दिसुन येत आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपला शिवसेनोची साथ मिळणं आवश्यक आहे. मात्र मुख्यमंत्री कोणाचा यावर आता भाजप शिवसेनेत चांगलच शीतयुद्ध रंगलं आहे.

शिवसेना आता मुख्यमंत्री पदावरून आग्रही आहे. ठरलेल्या फिफ्टी-फिफ्टी च्या फॉरमुल्या नुसार मुख्यमंत्री पद हे शिवसेनेलाच मिळावे अशी मागणी शिवसेनेने केली. शिवसेनेच्या आमदारांनी देखील शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. भाजपाला सत्ता स्थापनसाठी शिवसेनेशी युती करणे आवश्यक आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी अमरावतीच्या गोपाल राणे या अतिऊत्साही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी “होय शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार…जय महाराष्ट्र !” असे लिहण्यात आले.

Updated : 28 Oct 2019 7:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top