News Update
Home > News Update > शिवसेना भाजप एकत्र येणार? पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे चर्चेला उधाण

शिवसेना भाजप एकत्र येणार? पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे चर्चेला उधाण

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. त्यातच पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेना भाजप एकत्र येणार? पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे चर्चेला उधाण
X

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. त्यातच पत्रकार परिषदांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर कटूता आली आहे. परंतू पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

2019 निवडणूकीनंतर मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत दुरावा निर्माण झाला. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात राज्यात सत्तेचे नवे समीकरण तयार केले. मात्र त्यानंतर दोन वर्षानंतरही पुन्हा एकदा शिवसेना भाजप एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यातच पंकजा मुंडे यांनी शिवसेना भाजप एकत्र येण्याच्या शक्यतेवर भाष्य केल्याने राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

बीड येथे पंकजा मुंडे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रीया दिली. संजय राऊत म्हणाले होते की, भविष्यात शिवसेना भाजप कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. मात्र त्यावर प्रतिक्रीया देतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आता यावर काही बोलू शकत नाही. त्यांची भावना आहे. त्यांच्या भावनेला पक्षातील प्रदेशाध्यक्ष उत्तर देतील. मात्र राजकारणात कधीही कुठली भविष्यवाणी बदलू शकते. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

त्यावर प्रतिक्रीया देतांना संजय राऊत म्हणाले की, भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून भाजप शिवसेनेला मोठा त्रास देत आहे. त्या त्रासाचा मी एक लाभार्थी आहे. त्यामुळे हा त्रास आणि मनस्ताप विचारात घेता शिवसेना भाजप कधीही एकत्र येणार नाही, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.Updated : 22 March 2022 2:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top