Home > News Update > पाली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा "एकला चलोरे" चा नारा

पाली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा "एकला चलोरे" चा नारा

पाली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा एकला चलोरे चा नारा
X

रायगड // राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे, मात्र आगामी पाली नगरपंचायत निवडणूकीत शिवसेना 'एकला चलोरे' च्या भूमिकेत आहे, शिवसेना पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य असून पाली नगरपंचायत निवडणूक शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विष्णुभाई पाटील यांनी पालीत पत्रकार परिषदेत केली. पाली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे 17 पैकी 17 सक्षम उमेदवार निवडणूक लढवतील , हे उमेदवार जनतेने विश्वासाने निवडून द्यावेत, आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा, पालीकर जनतेची स्वप्ने, त्यांच्या मनातील विकास व परिवर्तन आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून घडवून दाखवू अशी ग्वाही विष्णुभाई पाटील यांनी दिली.

पाली नगरपंचायत प्रभाग रचनेची आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यानंतर आगामी नगरपंचायत निवडणुकांचे पालीत बिगुल वाजले, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीचा पहिला नगराध्यक्ष विराजमान होण्यासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात असून त्यादृष्टीने चुरस होणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना विष्णूभाई पाटील पुढे म्हणाले, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेबांच्या मार्गदर्शनातून शिवसेना पक्षसंघटना बळकटीबरोबरच जनतेचे विविध प्रश्न व समस्या मार्गी लावण्यावर भर दिला जातोय. विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून पाली गावाला झुकते माप देण्याचे देसाई यांनी आश्वाशीत केले असल्याचे पाटील म्हणाले. आम्हाला लोकाभिमुख कामांबरोबरोच जनतेची सेवा करायची आहे. शिवाय शिवसेना सत्तेत असल्याने विकासकामांना मोठी चालना व निधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक दृष्ट्या पालीचा चेहरा मोहरा बद्दलवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. विशेषतः पालिकर जनतेला शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे सतावत आहे, नेहमीच पालिकर जनतेला प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींकडून शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या वल्गना केल्या जातायेत, पोकळ व फसव्या आश्वासनांनी जनतेची कायम दिशाभूल व फसवणूक केली असल्याचे विष्णुभाई पाटील म्हणाले.पाली नगरपंचायत होऊ नये यासाठी शेतकरी कामगार पक्ष कारणीभूत ठरला आहे. पाली नगरपंचायत होण्यास विलंब झाल्याने विकास रखडला आहे, याला जबाबदार शेकाप असल्याचा आरोप विष्णुभाई पाटील यांनी केलाय.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यानेच अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीचा मार्ग मोकळा झाला आहे, पालीच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्द करून देण्याची ग्वाही देखील ना.शिंदे यांनी दिली असल्याचे पाटील म्हणाले. नवीन पिढीला शुद्ध पाणी मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे, आता मंत्रिमंडळात सत्तेत गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा मंत्री असल्याने त्यांच्या माध्यमातून पालिकरांचा ज्वलंत व जिव्हाळ्याची आजवर

प्रलंबित असलेला शुद्ध पाणी प्रश्न येत्या एका वर्षात सोडविणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते विष्णुभाई पाटील यांनी दिली.

या पत्रकार परिषदेस शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विष्णुभाई पाटील, युवा नेते अनुपम कुलकर्णी, अविनाश शिंदे,संदेश सोनकर , भास्कर दुर्गे आदी उपस्थित होते.

Updated : 21 Nov 2021 5:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top