कर्जमाफीवरुन शिवसेनेचं श्रेयाचं राजकारण

महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत असलेल्या कर्जाची माफी करण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात घेतला आहे. पण कर्जमाफीच्या या निर्णयाला आता नवीन राजकीय रंग चढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निर्णयाच्या श्रेयवादावरुन आता महाविकास आघाडीतही (MahaVikasAaghadi)  बिनसण्याची चिन्ह दिसु लागली आहेत.

हे ही वाचा…

शिवसेना (ShivSena) या कर्जमाफीनंतर या निर्णयाचं एकट्यानं श्रेय घेत असल्याचं पक्षातर्फे लावलेल्या बॅनरवर पाहायला मिळतंय. या बॅनरवर ‘गोरगरिब शेतकऱ्यांना पीक कर्जावर दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमुक्ती करुन दाखवलं’, असा मजकूर छापण्यात आलाय. पण या बॅनरवर महाविकास आघाडीचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही आणि राष्ट्रवादी (NCP) किंवा काँग्रेसच्या (Congress) एकाही नेत्याचा फोटो या बॅनवरवर छापवण्यात आलेला नाही. यावरुन कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे.

शिवसेना सरसकट कर्जमाफी (Farmers Debt Forgiveness) असा उल्लेख आपल्या जाहिरातींमधुन करत आहे. पण शिवसेनेनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असं आश्वासन दिलं होतं आणि आता  शेतकऱ्यांची फसवणुक करुन सेना श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपतर्फे केली जातेय.