Home > Election 2020 > २९ सप्टेंबर ला होणार युती? असा असेल शिवसेना-भाजपचा नवा फार्म्युला

२९ सप्टेंबर ला होणार युती? असा असेल शिवसेना-भाजपचा नवा फार्म्युला

२९ सप्टेंबर ला होणार युती? असा असेल शिवसेना-भाजपचा नवा फार्म्युला
X

शिवसेना-भाजपचं जागाचं गणित जुळलं असून युतीची 29 सप्टेंबरला घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार आहेत. त्यामुळे जागावाटपात भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. उर्वरित जागा मित्रपक्षासाठी सोडण्यात येणार आहे. शिवसेना सोडून इतर मित्रपक्ष भाजपच्या 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

या पाच जागांमुळे युतीमध्ये होता अडथळा

भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली. शेवटच्या 11 जगांचा प्रश्न काही प्रमाणात सुटून तो आता फक्त 5 जागांच्या तडजोडीवर आला आहे. आता 5 विधानसभा मतदारसंघातील तिढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात होणाऱ्या अंतीम चर्चेतून सोडवला जाणार आहे. युतीच्या जागावाटपात दोन्ही पक्षांनी युती तूटेल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही, याची काळजी घेतल्यामुळे युती राहाणार असल्याचे चित्र दिसत आहे. दोनही पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग झाल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. या बदलत्या परिस्थितीत काही अडचणी असल्याने हा विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तुटेपर्यंत ताणणार नाही, असे दोन्ही पक्षांनी ठरवल्यामुळे युती तुटणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

Updated : 26 Sep 2019 4:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top