Home > News Update > शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये का झाला राडा?

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये का झाला राडा?

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये का झाला राडा? Ayodhya land row: BJP, Shiv Sena workers come to blows over Saamana editorial

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये का झाला राडा?
X

प्रभू रामाची प्रतिष्ठा राखा! अशा ठळक मथळ्याखाली शिवसेनेच्या मुखपत्र 'सामना' मध्ये अग्रलेख छापन्यात आला होता. या अग्रलेखात भाजपवर सडकून टीका करण्यात आली होती. या टिकेनंतर आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान शिवसैनिक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं असून आता दादर परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला आहे. पोलिस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय म्हटलं होतं सामनाच्या अग्रलेखात...

अयोध्येत उभे राहत असलेल्या राम मंदिरासाठी जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला आहे. यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. पण आता याप्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाममधून ही मागणी करण्यात आली होती...

अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम व त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल.

काय आहे प्रकरण?

अयोध्येच्या हद्दीत येणाऱ्या बागा बिजैसी गावातील जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी या दोन व्यक्तींनी खरेदी केली होती. ही जमीन कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून 18 मार्च ला दोन कोटी रुपयांना खरेदी केल्याचा दावा संजय सिंह यांनी केला आहे.

संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी झालेल्या या व्यवहारानंतर पाचच मिनिटांनी चंपत राय यांनी हिच जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांच्याकडून साडे अठरा कोटी रुपयांमध्ये खरेदी केली, असा आरोप सिंग यांनी केला आहे. त्यामुळे दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या जमिनीचा भाव दर सेकंदांला जवळपास साडेपाच लाखांनी वाढला, जगात कुठेही जमिनीचा भाव एवढ्या वेगाने वाढत नाही, त्यामुळे हा घोटाळा आहे आणि याची ईडी तसेच सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी सिंग यांनी केली होती.

कोणी काय म्हटलंय?

भाजपा कार्यकर्ते शिवसेना भवनवर हल्ला करणार होते – सदा सरवणकर "भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनात जमले होते. पण जेव्हा भाजपाचे काही कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली तेव्हा शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली. शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाजपाची योजना होती," असा आरोप स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे.

Updated : 16 Jun 2021 2:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top