Home > News Update > पवारांच्या अर्थखाते वाटपाविरोधात शिंदे दिल्लीला गेले होते- संजय राऊत

पवारांच्या अर्थखाते वाटपाविरोधात शिंदे दिल्लीला गेले होते- संजय राऊत

पवारांच्या अर्थखाते वाटपाविरोधात शिंदे दिल्लीला गेले होते- संजय राऊत
X

अजित पवारांना अर्थखात्याच्या वाटपाला विरोध करण्यासाठी शिंदे दिल्लीला गेले होते या संदर्भात खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषदेत बोलले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना वित्त व नियोजन खाते देण्यास विरोध करण्यासाठी दिल्लीला गेले होते, पण दिल्लीतील भाजप सरकार ही मागणी मान्य केली नाही. असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं

"शिंदे दिल्लीला गेल्याची आणि त्यांच्या मागणीची माहिती माझ्याकडे आहे.ते पुढे म्हणाले की दिल्लीने एकनाथ शिंदे यांचे ऐकले नाही. तुम्हाला राहायचे असेल तर राहा, अन्यथा तुम्ही जाण्यास मोकळे आहात," असेही एकना शिंदे यांना सांगितले असल्याचे राऊत म्हणाले.

राऊत यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे यांना भाजप सरकार एकतर पवार यांच्याकडे अर्थखात्याचा भार द्यावा किंवा त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोडावे, असा प्रस्ताव दिला होता. "या प्रस्तावामुळे शिंदे यांनी मागार घेतल्याची माझी माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांना अर्थखाते मिळाले," असा दावा त्यांनी केला. या प्रस्तावामुळे शिंदे यांनी जे खात मिळालं ते स्विकारलं अशी माझी माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांना अर्थखाते मिळाले," असा दावा त्यांनी केला.

Updated : 15 July 2023 9:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top