Home > News Update > MLA Anil Babar : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे दु:खद निधन, खानापुर मतदारसंघावर शोककळा

MLA Anil Babar : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे दु:खद निधन, खानापुर मतदारसंघावर शोककळा

MLA Anil Babar : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे दु:खद निधन, खानापुर मतदारसंघावर शोककळा
X

खानापुर मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. न्युमोनिया झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या जाण्याने खानापुर मतदार संघावर शोककळा पसरली आहे. सांगली येथे एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आमदार अनिल बाबर यांची राजकीय कारकीर्द

अनिल बाबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू असे नेते होते. अनिल बाबर यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. सांगली जिल्हा परिषदेपासून १९७२ला त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. १९८१ मध्ये ते सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी १९९० साली प्रवेश केला. १९९९ ला पुन्हा आमदार म्हणून त्यांची निवड झाली. २०१४ आणि २०१९ मध्ये ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी शिंदेंना साथ दिली होती. नव्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. पण त्यांचे मंत्रीपदाचे स्वप्न अपूर्ण राहिले

Updated : 31 Jan 2024 3:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top