Home > News Update > #RajKundraArrest : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला का अटक झाली?

#RajKundraArrest : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला का अटक झाली?

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पोलिसांनी अश्लील फिल्म तयार केल्याप्रकरणी अटक केली आहे. राज कुंद्रा याने नेमके काय केले आहे याची माहिती आता समोर आली आहे.

#RajKundraArrest : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला का अटक झाली?
X

अश्लील सिनेमे बनवणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राज कुंद्रा विरोधात भक्कम पुरावे असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. याच पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. सोमवारी रात्री उशिरा चौकशीनंतर उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचता पती राज कुंद्रा याला बेड्या ठोकण्यात आल्या.

राज कुंद्रा याच्या अटकेच्या 10 तासानंतर पोलिसांनी नेरुळ परिसरातून आणखी एकाला अटक केली आहे. रयान थारप असं अटकेत असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात आतापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना मुंबई क्राईम ब्रांचने गजाआड केले आहे.

या प्रकरणात फेब्रुवारी 2021 मध्येच राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल झाली होती. सोमवारी रात्री उशिरा मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने त राज कुंद्रा यांची चौकशी केल्यानंतर अटक केली. दाखल झालेल्या तक्रारीमध्ये राज कुंद्रा अश्लील सिनेमे बनत होता आणि ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रसारित करत होता असा आरोप करण्यात आला आहे.

राज कुंद्राच मास्टर माईंड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा आणि त्याच्या भावाने ब्रिटनमध्ये एक कंपनी स्थापन केली होती. केनरिन असे या कंपनीचे नाव आहे. याच माध्यमातून राज कुंद्रा याने तयार केलेले पॉर्न सिनेमे दाखवले जात होते. पोर्न सिनेमाचे व्हिडिओ भारतामध्ये शूट केले जात होते. हे व्हिडिओ शूट केल्यानंतर परदेशात आपल्या भावाकडे पाठवण्याचे काम राज कुंद्रा करत होता. राज कुंद्रा हे व्हिडिओ आपल्या भावाला वी ट्रान्सफरच्या माध्यमातून पाठवत असे. फेब्रुवारीमध्ये मुंबतील मढ इथल्या एका बंगल्यात अश्लील व्हिडिओ शूट केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळीली होती. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन अभिनेत्यांना अटक करण्यात आली होती. तसेच बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी आलेल्या दोन तरुणींनाही इथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

राज कुंद्रा याला काय शिक्षा होऊ शकते?

पोर्नोग्राफी व्हिडिओ तयार करुन मोबाईलच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा याच्यावर भारतीय दंड संहिता 292, 293, 420, 34 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट u/s 2(g), 3, 4, 6, 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील नितीन धांडोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील कलमांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार आरोपी दोषी सिद्ध झाल्यास राज कुंद्रा याला सात वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

Updated : 20 July 2021 8:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top