Sharad Pawar's press conference : एका दगडात दोन पक्ष मारणे !
पत्रकार परिषदेतून शरद पवार यांनी किमान शब्दात कमाल अर्थ कसा पोहचवला सांगताहेत लेखक विश्वंभर चौधरी..
X
Sharad Pawar's press conference शरद पवार यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे अधिक गुंतागुंत वाढली आहे. शरद पवार यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय ? या संपूर्ण पत्रकार परिषदेचं थोडक्यात विश्लेषण केलं आहे लेखक विश्वंभर चौधरी यांनी...
एका दगडात दोन पक्ष मारणे.
ज्येष्ठ पवारांची आत्ता सकाळची मुलाखत पहा. पुढच्या पिढीच्या राजकारण्यांनी शिकण्यासारखं खूप काही आहे.
1. शपथविधी होणार हे मला माहित नाही असं म्हणून या सगळ्या खेळात आम्ही नाही हे स्पष्ट केलं.
2. पटेल, तटकरेंनीच हे केलं असं सूचित करून दोघांना एक्सपोज करून टाकलं.
3. एवढ्या घाईत हा निर्णय का झाला ते माहीत नाही असं सांगून राष्ट्रवादीचं विलिनीकरण भाजपा + प्रफुल्ल पटेल + तटकरेंना नको आहे, ते विलिनीकरणाला घाबरत आहेत हे पोचवलं.
4. बारा तारखेला विलीनीकरण होणार होतं हे सांगून आत्ता दादांचा पक्ष जे वागत आहे ते दादांच्या अंतिम इच्छेविरूद्ध वागत आहे हा संदेश तिकडच्या सामान्य कार्यकर्त्यांना देऊन टाकला. दादा म्हणजे आम्हीच; पटेल तटकरे नव्हेत हे हायलाईट करून टाकलं.
5. अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रावहिनींचा कुटूंबाशी संवाद झालेला नाही हे सांगून उर्वरित पवार कुटूंब या निर्णयात नाही हे सांगून टाकलं.
या पत्रकार परिषदेच्या आधी म्हणजे काल बारामतीत नीरा नदीची पाहणी करून मोठा मेसेज दिला. बारामतीचा सातबारा मी अजितदादाच्या नावे केला होता, आता अजितदादा गेल्यावर मी म्हणजे मूळ मालकानं सातबारा स्वतःच्या नावावर परत घेतला आहे हा तो मेसेज. किमान शब्दात कमाल अर्थ पोचवणे याला म्हणतात. किंवा एका दगडात दोन पक्ष मारणे.
पाहा संपूर्ण व्हिडिओ
(साभार- सदर पोस्ट विश्वंभर चौधरी यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






