Home > News Update > अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
X

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिलीय. मी पाच वरून ६९ आमदारांपर्यंत पक्ष पोहोचवला. मला सोडून गेलेल सर्व पराभूत झाले. हे चित्र पुन्हा दिसेल, हाच माझा यापुढील एक कलमी कार्यक्रम राहिल, असा गर्भित इशाराच शरद पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केलेल्यांना दिला आहे.

मागील काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्हं हटवलं होतं. अशा परिस्थितीत ते टोकाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती, ही शक्यताच आज खरी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्वासाच्या बळावरच आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचं ट्विट अजित पवार यांनी केलं.

राजभवनातील शपथविधीनंतर अजित पवारांनी ट्विट केलंय. ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्वासाच्या बळावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. माझ्या या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल असा विश्वास देतो..असंही अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान अजित पवार यांच्या बंडावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की,”पाच आमदारांचा नेता म्हणून मी पुन्हा पक्ष बांधला. मी पाच वरून ६९ आमदारांपर्यंत पोहोचलो, जे मला सोडून गेले. त्यापैकी जवळपास सर्व पराभूत झाले होते. हे चित्र पुन्हा कसं दिसेल हा माझा एक कलमी कार्यक्रम राहिल, असे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार म्हणाले की, “आजच्या बैठकी संदर्भात छगन भुजबळ मला म्हणाले मी तेथे जातो आणि काय होतंय ते तुम्हाला कळवतो असे छगन भुजबळ मला सांगून गेले. त्यांनी काही सांगितलं नाही. पण त्यांनी देखील शपथ घेतल्याचे मला कळाले. आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ता असल्याचं पवारांनी सांगितले. परंतु राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर अजित पवार यांनी दावा ठोकला असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, नाव घेउन कुणी काही भूमिका घेतली तरी आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची भूमिका मांडू, असंही शरद पवार म्हणाले.

Updated : 2 July 2023 12:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top