रिअल इस्टेट क्षेत्र वाचवा: शरद पवार यांचं नरेंद्र मोदी यांना पत्र

रिअल इस्टेट सेक्टर वर सध्याच्या महामारीचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं हे क्षेत्र पुर्णपणे कोलमडण्याची भीती तज्ञ व्यक्त करत आहेत. जवळपास तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कामगारांच्या हातची कामं गेली आहेत. अनेक प्रोजेक्ट रखडले आहेत. त्यातच विक्री देखील थांबली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील आर्थिक घडामोडीचं चाकं पूर्णपणे गाळात रुतलं आहे. अशा परिस्थितीत जीडीपीवर मोठा परिणाम झाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सरकार कडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या साथीमुळे देशभरात लॉकडाऊन दरम्यान भारतातील रिअल इस्टेट सेक्टरच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआरईडीएआय) देखील यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करून रिअल इस्टेट क्षेत्राला सपोर्ट करावा. अशी विनंती केली आहे. याचा दाखलाही शरद पवार यांनी आपल्या पत्रात दिला आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या पत्रानंतर अर्थव्यवस्थेच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्र असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार काय आवश्यक त्या उपाययोजना करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय हित म्हणून काय निर्णय घेतात? आणि काय कृती करतात? हे पहाणं महत्वाचं आहे.