Home > News Update > रंजन गोगई यांचं 'ते' विधान धक्कादायक: शरद पवार

रंजन गोगई यांचं 'ते' विधान धक्कादायक: शरद पवार

माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगई यांच्या भारतीय न्यायव्यवस्थेबाबतच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे... पाहा काय म्हटलंय शरद पवार यांनी...

रंजन गोगई यांचं ते विधान धक्कादायक: शरद पवार
X

"देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही. तिथे तुम्हाला न्याय मिळत नाही." भारतीय न्यायव्यवस्थेबाबत अशी टीका दुसऱ्या कोणी नाही तर देशाचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी केली आहे. ते एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

रंजन गोगोई यांच्या या प्रतिक्रियेनंतर यावर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी सरन्यायाधीशांच्या या प्रतिक्रियेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

'गेल्या आठवड्यात माझ्या वाचनात आले होते की, देशातील न्यायव्यवस्था उच्च आहे. न्यायाधीश यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी हा उल्लेख केला होता. त्याबाबत आनंद झाला; पण गोगई यांचे विधान धक्कादायक आहे. त्यांनी न्याय व्यवस्थेबाबत त्यांच्या परीने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला का? हे मला ठावूक नाही. त्यांचे विधान प्रत्येकाला चिंता करायला लावणारं आहे.' असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 14 Feb 2021 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top