शरद पवार – उद्धव ठाकरे भेट, मातोश्रीवर खलबते

Courtesy:Social Media

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना गेल्या दोन दिवसांपासून वेग येऊ लागला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांची सकाळी भेट घेतल्यानंतर संध्याकाळी अचानक ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. बंद दाराआड नेमकी काय काय चर्चा झाली ते समजू शकलेले नाही. या बैठकीला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हेसुद्धा उपस्थित होते. शरद पवार यांची मातोश्री भेट ही पूर्वनियोजित नव्हती तर अचानक ठरली. या बैठकीत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा झाली आणि राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं समजतंय.