Home > News Update > अजित पवार मुंबईत? शरद पवार पुण्याहून तातडीने मुंबईकडे रवाना

अजित पवार मुंबईत? शरद पवार पुण्याहून तातडीने मुंबईकडे रवाना

अजित पवार मुंबईत? शरद पवार पुण्याहून तातडीने मुंबईकडे रवाना
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सकाळी तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मागच्या १२ तासांहून अधिक काळ नॉट रिचेबल असलेले अजित पवार मुंबईतच असण्य़ाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवारांनी काल संध्याकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते अज्ञातवासात गेले. स्वतः शरद पवारांनीही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, तो होऊ शकला नाही.

त्यानंतर काल रात्र शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं. मात्र, अजित पवार नेमके कुठे आहेत याबाबत त्यांनाही कल्पना नसल्याचं सांगितलं होतं. अजित पवार हे नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्यावर आहेत असं बोललं जात होतं. मात्र, काल पुण्यात असलेले शरद पवार आज अचानक मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे अजित पवार हे मुंबईतच असण्याची शक्यता आहे.

Updated : 28 Sep 2019 4:54 AM GMT
Next Story
Share it
Top