Home > News Update > पवारांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर IT च्या धाडी शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

पवारांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर IT च्या धाडी शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

पवारांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर IT च्या धाडी शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
X

आज 7 ऑक्टोबर पवार कुटुंबाच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. दौंड शुगर, अंबालिका शुगर, जरंडेश्वर, पुष्पदंतेश्वर शुगर कारखान्यांवर छापेमारी केली आहे.

हे सर्व साखर कारखाने पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे सांगण्यात येत आहेत. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे.

आयकर विभागाने मुंबई, पुणे, नागपूरमधे एकाचवेळी धाडी टाकल्या आहेत.

बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याचे सांगितले जात आहे.

यावर आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले...

मला असं वाटतं की, हा सत्तेच्या अधिकाराचा अतिरेक आहे. त्यामुळे लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे की, अशा प्रकारे अधिकारांचा गैरवापर आपण किती वेळा सहन करायचा. आयकर भरण्यासंदर्भात संस्थांमध्ये काही शंका असतील तर त्या संदर्भात तपासणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र ज्यांच्या व्यवहाराची चौकशी करायची आहे, त्या व्यवहारात संबंध नसलेल्या कुटुंबातील मुलींच्यासुध्दा चौकशी करण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेशच्या घटनेवर माझ्यासह सर्व सहकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली होती. तेथे सात ते आठ शेतकऱ्यांना चिरडले गेले. अशी घटना यापूर्वी कधी घडली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत निषेध केला आहे. शेतकऱ्यांवर झालेला हल्ला हा जालियनवाला बागेसारखाच होता.

अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी यावरुन किरिट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

काही लोक आरोप करून, भाषण करून काहीही बोलतात. मात्र ते बोलल्यानंतर काही वेळातच केंद्रीय यंत्रणा कारवाई करण्यासाठी पुढे येतात. हे सगळ्यात आक्षेपार्ह आहे.

असं म्हणत किरिट सोमय्या यांच्या भेटीनंतर अशा कारवाया होणं अयोग्य असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 7 Oct 2021 4:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top