Home > News Update > आश्वासन पूर्ण न करणाऱ्या भाजप खासदाराला खेळाडूंनी कोंडले, पोलिसांनी मुश्किलीने सोडवले

आश्वासन पूर्ण न करणाऱ्या भाजप खासदाराला खेळाडूंनी कोंडले, पोलिसांनी मुश्किलीने सोडवले

आश्वासन पूर्ण न करणाऱ्या भाजप खासदाराला खेळाडूंनी कोंडले, पोलिसांनी मुश्किलीने सोडवले
X

नेते निवडणूक जिंकण्यासाठी जनतेला विविध प्रकारचे आश्वासन देत असतात. मात्र, जनतेने ही आश्वासन पूर्ण केली नाही तर जनता देखील नेत्यांना धडा शिकवते. असे अनेक उदाहरण अलिकडे आपल्याला मिळतात.

अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये घडली आहे. भाजप खासदार अरुण कुमार सागर यांना खेळाडूंनी कोंडून ठेवले होते. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खासदारांची सुटका केली. स्थानिक खासदार स्टेडियमवर पोहोचले होते. मात्र, ते तिथे पोहोचताच उपस्थित खेळाडूंचा संताप अनावर झाला. याचे कारण भाजप खासदार अरुण सागर यांनी विजेत्या संघांना बक्षीस म्हणून रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन खासदारांनी न पाळल्याने खेळाडूंनी संताप व्यक्त केला.

संतप्त झालेल्या खेळाडूंनी स्टेडियमच्या गेटला कुलूप लावले आणि खासदारांना आत कोंडून ठेवले. यावेळी खेळाडूंनी घोषणाबाजी करत खासदारांच्या स्वागताचे बॅनर आणि पोस्टर्स फाडले. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी खेळाडूंना गेट उघडण्यास सांगितले. यावेळी पोलिसांची आणि खेळाडूंची जोरदार बाचाबाचीही झाली. पोलिसांनी कसेतरी खेळाडूंना शांत केले आणि खासदारांना स्टेडियमच्या बाहेर काढले.

खासदारांनी विजेत्या संघाला पैसे दिले जात नाही. या खेळाडूच्या आरोप खोट असल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे खासदारांनी अनेक आश्वासने देऊनही विजेत्या संघाला पैसे मिळत नसल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. एका खेळाडूने सांगितले की, त्याला स्टेडियममध्ये जेवणही दिले जात नव्हते. प्रत्येक विजेत्या संघाला 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते, ते ही देण्यात आले नाही आणि त्यामुळे आम्ही खासदारांना विरोध केला.

महिला खेळाडूंनी सांगितले की, त्यांना पोलिसांनी मारहाण केली आणि असभ्य वर्तनही केले. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या तोंडावर खासदारांना अशा प्रकारे कोंडून ठेवल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.

Updated : 26 Nov 2021 1:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top