Home > News Update > Rave Party : आर्यन खान प्रकरणी शाहरूखच्या ड्रायव्हरची चौकशी

Rave Party : आर्यन खान प्रकरणी शाहरूखच्या ड्रायव्हरची चौकशी

Rave Party : आर्यन खान प्रकरणी शाहरूखच्या ड्रायव्हरची चौकशी
X

मुंबई क्रुज ड्रग पार्टी केस प्रकरणी सध्या आर्यन खान तुरूंगात आहे. यामुळे शाहरूख खान अडचणीत सापडलेला असताना त्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. नार्कोटीक्स कन्ट्रोल ब्युरो(NCB) ने आता शाहरूख खानच्या ड्रायव्हरला देखील समन्स बजावले आहेत. सध्या त्याची मुंबई येथील एनसीबी कार्यालयात चौकशी सुरू आहे.

क्रूझ पार्टीला जाण्यासाठी याच ड्रायव्हरने त्याला सोडलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. हाच ड्रायव्हर आर्यन खान आणि अरबाज मर्चंट ला एकाच गाडीतुन मुंबईहुन गोव्याला घेऊन गेला होता. अरबाजजवळ चरस नावाचे ड्रग्ज सापडले होते. या प्रकरणातील धागे दोरे जोडण्यासाठी या ड्रायव्हर ला आता NCB ने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे शाहरूख खानचा ड्रायव्हर सध्या NCB कार्यालयात उपस्थित आहे. आता या प्रकरणात त्याची देखील कसुन चौकशी करण्यात येत आहे.

Updated : 9 Oct 2021 2:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top