Home > News Update > काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात केले दाखल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात केले दाखल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात केले दाखल
X

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काल संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या दोन दिवसांपासून मनमोहन सिंग यांना ताप येत आहे. यातून प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे अखेर त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एप्रिल महिन्यात मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना एम्समध्येच दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. मनमोहन सिंग कोरोनावर मात करून ते घरी देखील परतले होते.

८९ वर्षीय मनमोहन सिंग यांना सोमवारी ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांना बरं वाटू लागलं होतं. मात्र, नंतर त्यांना अशक्त वाटू लागल्याने अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Updated : 14 Oct 2021 2:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top