मुख्यमंत्री साहेब आपलं वचन कधी पूर्ण करणार?

41

जवळपास 6 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. कोरोनाच्या या जागतिक महामारीमूळे सध्या मुलांच्या शिक्षणाचे खूप मोठे नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षणपद्धत फक्त श्रीमंत मुलांची झाली असून गोरगरीब मुलांना या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. निवडणुकी पूर्वी शिवसेनेने वचन नामा केला होता.त्या वाचनाम्यात सत्तेत आलो तर आम्ही राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना टॅब वाटू असा वचनानामा तयार करण्यात आला होता. आज शिवसेना राज्यात सत्तेत आहे. त्यातच कोरोनाचं मोठं संकट असल्यानं उद्धव ठाकरे यांनी आपलं वचन पूर्ण करण्याची ‘हीच ती वेळ आहे’. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं वचन पूर्ण करुन राज्यातील विद्यार्थांना मदत करावी. अशी मागणी आता पुढं येत आहे.

शेतकऱ्यांची मुलगी निकिता शेंडगे सांगते. घरी मोबाईल नसल्याने शिक्षण घेता येत नाही. छोटा मोबाईल असल्याने सरांनी पाठवलेला अभ्यास त्यामध्ये नीट दिसत नाही. एखादे वाक्य किंवा काही कळाले नाही. तर ते विचारता येत नाही. त्यामुळे शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे.

शेतकरी नारायण शेंडगे सांगतात, राज्यातील असे अनेक विद्यार्थी आहेत. ते घरी मोबाईल घेण्याची परिस्थिती नसल्याने शिकू शकत नाहीत. तर काही कुटुंबात चार-चार मुलं शिक्षण घेत आहेत. आणि घरी एकही मोबाईल नाही अशी परिस्थिती ग्रामीण भागात आणि शहरी भागात पण पाहायला मिळते. यामुळे मुलांच्या शिक्षणाचे खूप मोठे नुकसान होताना दिसत आहे.

निवडणूक पूर्वी मात्र, मोठं-मोठ्या घोषणा व आश्वासने देणारी नेते मंडळी आता कुठेही जाऊन बसली? असा सवाल आता राज्यातील गरीब व उपेक्षित शेतकरी विचारात आहे. आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सत्तेत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळं शिवसेनेनं आपलं दिलेलं वचन पूर्ण करावी अशी मागणी आता समोर येत
आहे.

“सत्तेसाठी काय पण”. करणारे राज्यकर्ते आता या विद्यार्थांच्या कितपत मदतीला धावून येणार हा खरा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Comments