Home > News Update > भाजप नव्हे, राष्ट्रवादीचे नेते बाहेर काढतायत शिवसेना मंत्र्यांचे घोटाळे

भाजप नव्हे, राष्ट्रवादीचे नेते बाहेर काढतायत शिवसेना मंत्र्यांचे घोटाळे

कधीकाळी एकमेकांचे शत्रू असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली खरी, पण त्याचं हे शत्रुत्व अजूनही काही संपायला तयार नाही.

भाजप नव्हे, राष्ट्रवादीचे नेते बाहेर काढतायत शिवसेना मंत्र्यांचे घोटाळे
X

औरंगाबाद: कधीकाळी एकमेकांचे शत्रू असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली खरी, पण त्याचं हे शत्रुत्व अजूनही काही संपायला तयार नाही. त्याचाच एक भाग म्हणजे आता राष्ट्रवादीचे नेते सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना मंत्र्यांचे प्रकरणं बाहेर काढू लागले आहेत. शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या गावातील त्यांच्याच खात्यातील कामात झालेला घोटाळा राष्ट्रवादीच्या नेत्याने समोर आणला आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी,काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष जरी सोबत असले, तरीही स्थानिक पातळीवर राजकीय विरोध मात्र,आजही कायम आहे. औरंगाबाद मध्ये स्थानिक पातळीवरचं असच राजकारण पुन्हा समोर आलाय.


शिवसेनेचे नेते आणि रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या स्वतःच्या गावात त्यांच्याच खात्यात घोटाळा झाला असून, हा घोटाळा राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी समोर आणला आहे. रोजगार हमी अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामासाठी दाखवण्यात आलेले कामगार चक्क कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचं समोर आलं आहे.

गोर्डे यांनी केलेल्या आरोपानुसार, औरंगाबाद- बीड हायवे ते साजेगाव रोड या रस्त्याचं काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचे काम कामगारांनी नव्हे तर जीसीपी आणि पोकलेनेच्या साह्याने करण्यात आले आहे. मात्र कागदोपत्री बोगस नाव दाखवण्यात आल्याचं आरोप गोर्डे यांनी केला आहे.


एवढच नाही तर, रस्त्याच्या कामासाठी दाखवण्यात आलेले कामगार कोविड पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप दत्ता गोर्डे यांनी केला आहे.

यावर बोलताना भुमरे म्हणाले की, हे प्रकरण मला आत्ताच कळाले आहे, त्यामुळे संबंधित प्रकरणाची माहिती घेत आहे.जर यात कुणी दोषी आढळत असेल तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. मी किंवा आमचं सरकार कधीच भ्रष्टाचारसारखे गोष्टींचा समर्थन करणार नाही.

Updated : 22 May 2021 6:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top