Home > News Update > ३१ डिसेंबर ला दारूला नाही म्हणा - पद्मश्री डॉ. अभय

३१ डिसेंबर ला दारूला नाही म्हणा - पद्मश्री डॉ. अभय

३१ डिसेंबर ला दारूला नाही म्हणा - पद्मश्री डॉ. अभय
X

नववर्षाची पहाट उंबरठ्यावर आली आहे. सर्वत्र जल्लोषपूर्ण वातावरण पसरायला लागले आहे. पण देशाचे भविष्य ज्या युवांच्या खांद्यावर आहे त्या तरुणाईला दारूच्या नशेत बेभान करून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची विकृत संस्कृती जन्म घेत आहे.

३१ डिसेंबरलाच अनेक युवक दारूचा पहिला घोट घेतात. पण थोडीशी गम्मत म्हणून घेतलेली दारू हळूहळू संपूर्ण शरीराचा ताबा घेते. यातूनच हिंसा, अत्याचार, अपघात अशा घटना जन्म घेतात. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी दारूच्या पहिल्या घोटापासूनच युवकांना दूर ठेवणे गरजेचे आहे. यासाठीच गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ अभियान, पोलिस प्रशासन आणि गोंडवाना विद्यापीठाद्वारे व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली असून ३१ डिसेंबरला सर्वांनी दारूला नाही म्हणा, नव्या वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करा असे आवाहन मुक्तिपथचे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले आहे.

Updated : 30 Dec 2019 4:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top