Home > Election 2020 >  आमच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून राहिलं : फडणवीस

 आमच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून राहिलं : फडणवीस

 आमच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून राहिलं : फडणवीस
X

सावरकरांच्या मुद्यावरुन वेळोवेळी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्या सरकारच्या काळात सावरकरांचा विसर पडला होता. हे समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात सावरकांना भारतरत्न द्या, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली खरी मात्र, सावरकरांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत नसल्याचं समोर आलं आहे. यावर फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, ‘राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव असायलाच पाहिजे. ते चुकून राहिले असेल, तर या सरकारने ताबडतोब ही चूक दुरुस्त करावी.’ असं म्हणत वेळ मारुन नेली.

विशेष म्हणजे राष्ट्रपुरुष, थोर पुरुष यादी जाहीर करण्याचं काम सामान्य़ प्रशासन करते. आणि सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे फडणवीस स्वत: मुख्यमंत्री असताना त्यांना सावरकारांचा विसर पडला होता का? अस सवाल उपस्थित होतो.

Updated : 28 Feb 2020 3:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top