Top
Home > News Update > आंदोलन; सरपंचाने इमारतीच्या छतावर भरवली सदस्यांची 'आंदोलन सभा'

आंदोलन; सरपंचाने इमारतीच्या छतावर भरवली सदस्यांची 'आंदोलन सभा'

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे निष्कृष्ट इमारत बांधकामाची चौकशी जिल्हाप्रशासनामार्फत व्हावी तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सरपंचासह सदस्यांनी आरोग्य उपकेंद्राच्या छतावर बसून शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

आंदोलन; सरपंचाने इमारतीच्या छतावर भरवली सदस्यांची आंदोलन सभा
X

खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा येथे सन 2008 मध्ये 20 लाख रूपये खर्चाचे बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतने आरोग्य विभागाकडे केली होती. मात्र त्याची कोणतेही दखल घेतली जात नसल्याने अखेर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी शोलेस्टाईल आंदोलन केले.

झालेले बांधकाम पाडून या ठिकाणी त्वरीत नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन त्याचे काम सुरू करावे. सबंधित अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करून त्यांच्याविरूध्द कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Updated : 23 Feb 2021 4:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top