Home > News Update > संकेत भोसले हत्या प्रकरणी भिवंडीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा

संकेत भोसले हत्या प्रकरणी भिवंडीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा

संकेत भोसले हत्या प्रकरणी भिवंडीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा
X

भिवंडी मध्ये 14 फेब्रुवारी रोजी संकेत भोसले या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या हत्येच्या निषेधार्थ भिवंडी मधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( सेक्युलर ) च्या नेतृत्वा खाली प्रचंड असा मोर्चा काढण्यात आला. यामोर्च्यात भिवंडी शहर, भिवंडी ग्रामीण, कल्याण, वासिंद परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर ) चे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, अ‍ॅड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.. संकेत भोसले ह्या तरुणाची हत्या केवळ महाविद्यालयात धक्का लागला एवढ्या कारणावरून येथील राजकीय प्रभाव असणाऱ्या धोत्रे नावाच्या तरुणांच्या वडील व त्याच्या समर्थकानी संकेतचे अपहरण केले, त्याचा भयंकर छळ करून त्याला बेदम मारहाण करून टाकून दिले.. इतकंच नव्हे तर मारहाण करतानाचे व्हिडीओ समाज माध्यमावर पोस्ट केले.. संकेत भोसले याचा या मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे तमाम आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली आहे तोच असंतोष मोर्चात पाहण्यास मिळालाUpdated : 29 Feb 2024 4:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top