Home > News Update > संजय राऊत यांची जिभ घसरली, नवनीत राणांवर खालच्या पातळीवर टीका...!

संजय राऊत यांची जिभ घसरली, नवनीत राणांवर खालच्या पातळीवर टीका...!

आपल्या पक्षाच्या प्रचारसभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत यांची जिभ घसरली, नवनीत राणांवर खालच्या पातळीवर टीका...!
X

संजय राऊत यांची जिब घसरली, नवनीत राणांवर खालच्या पातळीवर टीका...!

भाजत नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. यापूर्वीही संजय राऊत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडलेले आहेत. अमरावती भाजपच्या उमेदवार नवणीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊतांनी भाषेची मर्यादा ओलांडली आहे. बाई नाची, बबली आणि डान्सर असा उल्लेख करत राऊतांना राणांवर व्यक्तीगत आक्षेपार्ह टीका केली आहे. तर नवणीत राणांनी याला प्रतिउत्तर देत म्हटलं आहे की, संजय राऊंतांनी केलेलं वक्तव्य हे साधारण टिप्पणी नसून हा महिलांचा अवमान आहे याउलट संजय राऊत हेच सध्या काँग्रेसच्या दरबारात नाचत आहेत, असा पलटवार नवनीत राणांनी केला.

दरम्यान भाजप नेत्या तथा अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊत हे दोघेही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहिलेले आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी संजय राऊत अमरावतीत आले, यावेळी सभेच्या व्यासपीठावरून बोलताना संजय राऊतांनी ही टीकेची झोड केली आहे.

बळवंत वानखेडे विरोधात नवनीत राणा नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे.ही लढाई मोदी विरूद्ध उद्धव ठाकरे, ही लढाई मोदी विरूद्ध शरद पवार, ही लढाई मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी आहे.’ असे वक्तव्य करत राऊतांनी राणांवर हल्लाबोल केलाय. तर दोन दिवसांपासून संजय राऊत अमरावतीत आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेमुळेच राम मंदिर झाल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

Updated : 19 April 2024 8:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top