Home > News Update > महागाई विरोधात संजय राऊत उतरणार रस्त्यावर; शिवसेनेचा भव्य मोर्चा निघणार

महागाई विरोधात संजय राऊत उतरणार रस्त्यावर; शिवसेनेचा भव्य मोर्चा निघणार

महागाई विरोधात संजय राऊत उतरणार रस्त्यावर; शिवसेनेचा भव्य मोर्चा निघणार
X

देशभरात वाढत्या महागाई विरोधात आता शिवसेना रस्त्यावर उतरून विरोध करणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे स्वतः रस्त्यावर उतरून या आंदोलनात सहभागी होणार आहे. औरंगाबाद शहरात संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा निघणार आहे.

शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, सर्व जीवनावश्यक वस्तूशिवाय,बँकींग, बांधकाम वस्तू, शेतीसाठीचे रासायनिक खते, बी-बियाणे सर्वच बाबींच्या दरवाढीने त्रस्त जनतेचा संताप शिवसेना 13 नोव्हेंबर रोजी रस्त्यावर उतरून व्यक्त करणार आहे. तसेच हा मोर्चा संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे.

तसेच 13 तारखेला निघणाऱ्या मोर्च्यापूर्वी 10 नोव्हेंबरला औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती आणि ग्रामीण भागात स्वाक्षरी अभियान राबवला जाणार आहे. तसेच 11 नोव्हेंबरला महिला आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. तर 13 तारखेला संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढला जाणार आहे.

Updated : 9 Nov 2021 7:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top